दुकानातून बॅटरीची चोरी करणाऱ्या नोकरास अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: August 30, 2023 17:40 IST2023-08-30T17:39:54+5:302023-08-30T17:40:23+5:30

बाळकूमच्या हायस्ट्रीट मॉलसमोर छाब्रीया पार्क मध्ये शॉप क्रमांक १२ मध्ये दिलीप माखीजा (४२) यांचे मोटारकारच्या बॅटरी विक्रीचे होलसेलचे दुकान आहे.

Servant who stole batteries from shop arrested, Kapurbavdi police action | दुकानातून बॅटरीची चोरी करणाऱ्या नोकरास अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई

दुकानातून बॅटरीची चोरी करणाऱ्या नोकरास अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठाणे - बाळकूम येथील दुकानातून मोटारींच्या बॅटरींची चोरी करणाऱ्या प्रेम शर्मा (१९, रा. शास्त्रीनगर, ठाणे) या नोकरास अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून चोरीतील २२ हजारांच्या दोन बॅटऱ्याही हस्तगत केल्या आहेत.

बाळकूमच्या हायस्ट्रीट मॉलसमोर छाब्रीया पार्क मध्ये शॉप क्रमांक १२ मध्ये दिलीप माखीजा (४२) यांचे मोटारकारच्या बॅटरी विक्रीचे होलसेलचे दुकान आहे. याच दुकानात २८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास दोन बॅटऱ्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी चोरीचा गुन्हा कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष पिंपळे, उपनिरीक्षक शंकर महाडीक यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या शास्त्रीनगर भागातील प्रेम शर्मा याला २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. तो याच दुकानातील नोकर असल्याचेही उघड झाले.

Web Title: Servant who stole batteries from shop arrested, Kapurbavdi police action