तरुणीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून तिचा विनयभंग करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 05:19 IST2017-11-21T05:19:19+5:302017-11-21T05:19:35+5:30

ठाणे : एका तरुणीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून तिचा विनयभंग करणा-या राजन रावत (२७) या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली.

Sentenced to molestation by sending obscene videos on the teenage mobile | तरुणीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून तिचा विनयभंग करणा-यास अटक

तरुणीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून तिचा विनयभंग करणा-यास अटक

ठाणे : एका तरुणीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून तिचा विनयभंग करणा-या राजन रावत (२७) या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने सोमवारी दिले. ही २१ वर्षीय तरुणी आणि या सुरक्षारक्षकाची जुजबी ओळख आहे. तो नौपाड्यात राहत असून वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ च्या एका बांधकाम सुरूअसलेल्या ठिकाणी नोकरीला आहे. आधी त्यांचे एकमेकांशी बोलणे होत होते. आता बोलणेही होत नसताना तो तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चित्रफीत टाकत होता. असे वारंवार झाल्याने तिने वागळे पोलिसांत १७ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. त्याच्याविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखलझाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने त्याला अटक केली.

Web Title: Sentenced to molestation by sending obscene videos on the teenage mobile