शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ओल्या कचऱ्यापासून खत विक्री करणार; मीरा भाईंदर महापालिकेला मिळाली मंजुरी

By धीरज परब | Updated: April 4, 2023 12:30 IST

खताची विक्री व विपणन आता शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडच्या नावाने करण्यास मंजुरी मिळाली आहे.

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेत ओल्या कचऱ्यापासून निर्माण केल्या जाणाऱ्या खताची विक्री व विपणन आता शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडच्या नावाने करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पालिका आता ओल्या कचऱ्या पासून होणारे खत शासनाच्या सदर ब्रँडच्या नावे विकले जाणार आहे. 

शहरात रोजचा सुमारे ५०० टन  कचरा निर्माण होतो . त्यात २५० ते ३०० टन ओला कचरा असतो .  उत्तन येथील डम्पिंग वर  नेला जातो . तेथे ओला कचरा वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती केली जात असल्याचे पालिका सांगते . शिवाय शहरात लहान ६ ओला कचरा प्रकल्प पैकी ३ सुरु झाले असून त्यातून वीज निर्मिती केली जाते. 

झाडांची छाटणी , तोड तसेच झाडांच्या गळती मधून निर्माण होणार पाला पाचोळा हा बेकायदा कुठेही टाकून नंतर त्याला आगी लावण्याचे प्रकार पालिके कडून होत होते. काही प्रकरणात पालिकेवर गुन्हा देखील दाखल झाला . जागरूक नागरिकांनी त्या पाला पाचोळ्या पासून खत निर्मितीची सूचना करून देखील पालिका दुर्लक्ष करत होती. तर मध्यंतरी निर्माल्या पासून पालिकेने खत निर्मिती करून त्याचे मोफत वाटप शहरातील काही शेतकऱ्यांना केले होते. 

दरम्यान शासनाच्या स्वच्छता अभियान अंतर्गत  शहरात निर्माण होणाऱ्या ओला कचरा व सुका पालापाचोळा वर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री करण्यासाठी राज्य शासनाकडून हरित महासिटी कंपोस्ट हा शासनाचा नोंदणीकृत ब्रँड वापरण्याची परवानगी दिली जाते . सदर ब्रँड पालिकेला वापरता यावा म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांनी शासन स्तरावर प्रयत्न चालवले होते.

पालिका निर्मित खताचा चाचणी अहवाल नाशिकच्या शासकीय प्रयोग शाळेत तपासल्या नंतर सेंद्रिय खत म्हणून पात्र असल्याचे प्रमाणित करण्यात आले होते . प्रयोगशाळेचा अहवाल व पालिकेचा प्रस्ताव नुसार शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये पालिकेस शासनाचा हरित महासिटी कंपोस्ट हा ब्रँड वापरण्यास परवानगी दिली आहे . त्यामुळे ओला कचरा व झाडांचा पाला पाचोळा पासून निर्माण होणाऱ्या खताची विक्रीसाठी पालिकेला शासनाच्या नोंदणीकृत ब्रँडचे पाठबळ मिळाले आहे.

आयुक्त ढोले यांनी सांगितले कि , शेतीसाठी आवश्यक असलेले पोटयाशियम, फॉस्फरस, नायट्रोजन (एनपीके) चे प्रमाण हे सेंद्रिय खत मधून जास्त मिळते. पालिकेला ब्रँड मिळावा म्हणून फेब्रुवारी मध्ये शासनाकडे पत्रव्यवहार केला होता . ठेकेदार मेसेर्स सौराष्ट्र एन्वायरो मार्फत प्रकल्पात दिवसाला ३० टन खत निर्मिती केली जाणार आहे. या सेंद्रिय खताची विक्री शासनाच्या ब्रँड द्वारे करून त्यातील १० टक्के नफा हा ठेकेदार पालिकेला देणार आहे . तर शहरातील नागरिकांच्या मागणी नुसार उद्याने, वृक्षारोपणासाठी मोफत खत दिले जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर