कोनगावच्या उपसरपंच पदी विनोद म्हात्रे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 19:29 IST2024-02-27T19:29:33+5:302024-02-27T19:29:48+5:30
कल्याण भिवंडी सीमेवर असलेल्या कोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विनोद हेंदर म्हात्रे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोनगावच्या उपसरपंच पदी विनोद म्हात्रे यांची निवड
भिवंडी: तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या तसेच कल्याण भिवंडी सीमेवर असलेल्या कोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विनोद हेंदर म्हात्रे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी उपसरपंच कविता गोरक्ष भगत यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी विनोद म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा सरपंच रेखा सदाशिव पाटील यांनी म्हात्रे यांची उपसरपंच पदी बिनविरोध नियुक्ती जाहीर केली. निवड जाहीर होताच म्हात्रे यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. तर ग्रामस्थांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदार व्यवस्थित पार पडणार असून ग्राम विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच विनोद म्हात्रे यांनी दिली आहे.
विनोद म्हात्रे यांची उपसरपंच पदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कोनगाव ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी मनीष महाजन यांच्यासह ग्राम पंचायतीचे सदस्य सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.