विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील जप्त मोटरसायकलला आग, ३० ते ३५ मोटरसायकल जळून खाक
By सदानंद नाईक | Updated: March 21, 2024 17:15 IST2024-03-21T17:15:51+5:302024-03-21T17:15:59+5:30
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जप्त केलेल्या मोटरसायकला गुरवारी आग लागून ३० ते ३५ जळून खाक झाल्या आहेत. ...

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील जप्त मोटरसायकलला आग, ३० ते ३५ मोटरसायकल जळून खाक
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जप्त केलेल्या मोटरसायकला गुरवारी आग लागून ३० ते ३५ जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडीसह उल्हासनगर, मध्यवर्ती, हिललाईन पोलीस ठाण्याच्या बाहेर जप्त केलेल्या मोटरसायकलीची खच पडून आहे. अशीच परिस्थिती उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस कार्यालयाची आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची यादी बनवून लिलाव करण्याची शक्यता गेल्याच आठवड्यात सहायक पोलीस आयुक्त अजय कोळी यांनी बोलून दाखविली होती.
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे व वाहतून विभागाने जप्त केलेल्या वाहनाचा गराडा पोलीस ठाण्या भोवती पडल्याचे चित्र आहे. गुरवारी अचानक मोटरसायकलीला आग लागल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन विभागाला फोन करून स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ३० ते ३५ मोटरसायकली जळून खाक झाल्या. याबाबत पोलीस चौकशी करीत असून पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जप्त केलेल्या मोटरसायकली दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे.