पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:16 PM2023-07-08T20:16:37+5:302023-07-08T20:20:25+5:30

चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.

Seeing the ambulance closed on the bridge, the Chief Minister Eknath Shinde stopped the convoy and... | पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्...

पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्...

googlenewsNext

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा प्रोटोकॉलच्या पुढे जाऊन आपलं काम करताना पाहायला मिळालं आहे. त्यात, आरोग्यसेवेसाठी ते सदैव पुढे असतात. त्यांच्यातील संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून माहिती घेतली आणि स्वत:च्या ताफ्यातील रुग्णावाहिका रुग्णासाठी देऊ केली. 

चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्यांना समजले. मात्र, या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. 

अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकाही देऊ केली. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा कृतीतून दाखवली. 

Web Title: Seeing the ambulance closed on the bridge, the Chief Minister Eknath Shinde stopped the convoy and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.