शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

बघ्यांची गर्दी अन पाहुण्यांकडून बिबट्याची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:01 IST

साडेसहा तासांचा थरार : ७० ते ८० जणांच्या बचाव पथकाची व्यूहरचना, फटाक्यांमुळे ताब्यात घेणे झाले शक्य

जितेंद्र कालेकर

ठाणे : ठिकाण कोरम मॉल... वेळ पहाटे ५.४० ची... मॉलच्या वाहनतळात बिबट्या शिरल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. याबाबत माहिती मिळताच वनविभागासह सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर, बिबट्या आणि शोध पथकामध्ये सुरू झालेला पाठशिवणीचा खेळ साडेसहा तास सुरू होता.

बिबट्या सत्कार रेसिडेन्सीमध्ये पोहोचल्याचे समजताच सर्व पथकांनी तिकडे धाव घेतली. अखेर, साडेसहा तासांच्या थरारानंतर त्याला पकडण्यात यश आले. तोपर्यंत बिबट्या शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे बचावकार्यात अडथळे आले. दरम्यान, हॉटेलमधील विदेशी पाहुणेही बिबट्याची उत्सुकतेने विचारपूस करत होते. बिबट्याला पकडण्यासाठी ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या वेगवेगळ्या पथकांनी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई, ठाण्याचे परिक्षेत्र वनअधिकारी दिलीप देशमुख आणि बोरिवली उद्यानाचे संजय वाघमोडे आदींच्या मार्गदर्शनाखाली पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पेठे, वनपाल रवींद्र तवर, मनोज परदेशी, वनरक्षक सचिन सुर्वे, अमिष रसाळ आणि वनमजूर संतोष भांगने आदी ७० ते ८० जणांच्या बचाव पथकाने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सकाळी ६.३५ पासून व्यूहरचना केली. सकाळी ७ वाजता तो सत्कार रेसिडेन्सीमध्ये शिरल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही बातमी बाहेर पसरताच बघ्यांची गर्दी तसेच बिबट्याला कॅमेºयात कैद करण्यासाठी हॉटेलची संरक्षक भिंत तसेच मिळेल ती जागा पकडल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. बिबट्या लपून बसल्याने सकाळी ७ ते ११ हे चार तास त्याची काहीच हालचाल नव्हती. अखेर, दोन कोंबड्या त्याच्या दिशेने सोडल्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल प्रशासनाकडे आवारात फटाके वाजवण्याची संमती मागितली. तोपर्यंत ज्या खोलीत तो शिरला होता, तिथे छोटे बीळ केले. फटाक्यांच्या आवाजाने तो बिळाच्या समोर येताच डॉ. शैलेश पेठे यांनी भिंतीच्या आडून २० फुटांच्या अंतरावरून रायफलीच्या साहाय्याने ट्रॅन्क्विलायझेशन हे इंजेक्शन ११.३० वाजता मारले. तो बेशुद्ध पडताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला पिंजºयात टाकले.

‘त्या’ कर्मचाऱ्याचा होणार सत्कारहॉटेलमध्ये शिरलेला बिबट्या सांडपाण्याची टाकी असलेल्या खोलीत गेल्याचे समीर शेख या देखभाल दुरुस्ती विभागाच्या कर्मचाºयाने पाहिले. त्याने प्रसंगावधान राखून त्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. त्यानंतरही अन्य एका दरवाजावाटे तसेच लोखंडी दरवाजाच्या वरील बाजूने बिबट्याला बाहेर पडणे शक्य होते. पण, आत गेल्यानंतर तो शांत राहिला. समीरच्या धाडसाचे कौतुक होत असून त्याचा लवकरच सत्कार करणार असल्याचे हॉटेलचे महाव्यवस्थापक प्रणबेश बॅनर्जी यांनी सांगितले.पालकमंत्र्यांनी घेतला आढावावर्दळीच्या ठिकाणच्या सिंघानिया शाळेसमोरील हॉटेल सत्कार रेसिडेन्सीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला.प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची पोलीस, वनकर्मचाºयांशी बाचाबाचीबिबट्याची छबी टिपण्यासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी हॉटेलच्या आवारामध्ये गर्दी केली होती. बिबट्याला नेण्यासाठी आणलेला पिंजरा हॉटेलच्या मागील प्रवेशद्वारावर होता. त्यानंतर तो पिंजरा आत नेला. तेव्हा छायाचित्रकारांना आत येण्यास बंदी केल्याने पोलीस, वनविभाग कर्मचारी यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. पिंजºयातून बिबट्याला वनविभागाच्या वाहनापर्यंत नेईपर्यंत छायाचित्रणासाठी झुंबड उडाली. यावेळी झालेल्या रेटारेटीमुळे काहींच्या कॅमेºयांचे नुकसानही झाले, तसेच धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर, आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी करत हावाद मिटवला.सकाळी८ वाजता सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबट्या दिसला. त्यानंतर, नियोजन करून तीन तासांमध्ये विविध पथकांच्या मदतीने त्याला भूल देऊन पकडले.- जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे

टॅग्स :thaneठाणेleopardबिबट्या