शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:15 IST

Security Outside Eknath Shinde's House :एकनाथ शिंदे निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

ठाणे : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांच्यासह घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानीही पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आला आहे. सध्या एकनाथ शिंदे इतर बंडखोर आमदारांसह गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आहेत. तेथे त्यांची बैठक सुरु असून सायंकाळपर्यंत सर्व बंडखोर आमदारांसह शिंदे मुंबईत परतण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे, झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, वाहतूक विभागाचे उपायुक्त दत्ता कांबळे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आज आढावा घेतला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अतिमहत्वाचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कारभारास सुरुवात केली. दरम्यान शिंदे यांच्या निवासस्थान आणि परिसरात सुशोभिकरण आणि अन्य सोयी-सुविधांसाठी पालिका कर्मचारी अधिका-यांनी धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिंदे हे सक्रीय झाले असून त्यांच्या बंडाला साथ देणारे अनेक सहकारी अद्यापही मुंबईबाहेर गोव्यामध्ये आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.  दरम्यान प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांनी देखील कंबर कसली आहे. त्यांनी शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराचा आढावा घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लवकरच बॅरिकेट्स लावण्यात येतील. सर्व एन्ट्री पॉईंट बंद करण्यात येतील. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री