शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:05 AM

नागरिकांचा निष्काळजीपणा : १९ दिवसांत आढळले नऊ हजार २८६ नवे रुग्ण

प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसाला ५०० हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सप्टेंबर महिन्यातील या १९ दिवसांमध्ये तब्बल नऊ हजार २८६ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे.केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. १४ मार्च ते ८ जून या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. आजच्याघडीला ही संख्या शनिवापर्यंत तब्बल ३८ हजार ३०१ पर्यंत पोहोचली असून यातील ७६२ जण मृत पावले. ३२ हजार ८८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असले तरी सप्टेंबरमध्ये रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० हून अधिक आहे. सुरुवातीला रोज दोन ते चार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. परंतु, अनलॉकनंतर रोज सरासरी ९ ते ११ दरम्यान मृत्यू होत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मृत पावणाºया रुग्णांची संख्या पाच ते सहावर आली आहे. मार्चपासून आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण जुलै महिन्यात आढळले. १ ते ३१ जुलैदरम्यान १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये रुग्ण आढळले याचा विचार करता जुलै महिन्यातील संख्या ओलांडण्याची दाट शक्यता आहे.तरुणांकडून नियमांचे उल्लंघनवाढते कोरोनाचे रुग्ण पाहता हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात सद्य:स्थितीला ४४ हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना येजा करण्यास बंदी असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केडीएमसीकडून सुरू आहे. परंतु, तरुणांकडून उल्लंघन होत आहे.ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, ते पाहता कोरोनाच्या दुसºया लाटेला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. या एकूणच परिस्थितीला नागरिकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. राज्य सरकार असो अथवा स्थानिक प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, अनलॉकमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नाही.- डॉ. प्रशांत पाटील, सचिव, कल्याण आयएमए

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस