शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

प्रथम दर्जाच्या डब्यात सेकंड क्लासचे प्रवासी, महिलेची टिष्ट्वटद्वारे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:34 AM

डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका टिष्ट्वटने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली

ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका टिष्ट्वटने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा तीन लोकलमधून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांची तिकीट तपासणी केली असता प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून प्रवास करणाºया आणि सेंकड क्लासचे तिकिट असणाºया ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे स्थानकातून रात्री जाणारी ८.५५ ची धीम्या मार्गावरील डोंबिवली लोकलमधील महिला प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून एका महिलेने सेंकड क्लासमधील काही प्रवासी चढल्याची तक्रार रेल्वे टिष्ट्वट सेलवर केली. त्या तक्रारीनुसार,टिष्ट्वट सेलने ती माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाला देऊन कारवाई करण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार, चार तिकिट निरीक्षक आणि चार रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रेल्वे स्थानकात तातडीने तैनात केले. रात्रीच्या ८.५५ वाच्या डोंबिवली लोकलसह अन्य दोन गाड्यांमधील प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी केली. त्यावेळी ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती ठाणे प्रबंधक कार्यालयाने दिली.