शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पालघरच्या त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील ११० जणांचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 1:55 PM

पालघरमधील मृत्यु झालेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुलुंड भागातील ११० कामगारांची शोध मोहीम आता सुरु झाली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने या कामगारांचा शोध सुरु झाला आहे. यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य कामगार हे झोपडपटटी भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे : कोरोनामुळे पालघरमधील सफाळे भागातील एकाचा मंगळवारी मृत्यु झाला आहे. तो ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील खाजगी कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आता ११० जणांचा शोध घेण्याची सुरवात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेला या ११० जणांची यादी दिली असून ते सर्वजण ठाण्याच्या विविध भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील काही कामगार हे नवी मुंबई, तर काही कामगार मुलुंड या भागातील असल्याची माहितीही समोर येत आहे.       मंगळवारी सांयकाळी पालघर भागातील सफाळे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरचा व्यक्ती हा ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. परंतु आता त्याच्या मृत्युमुळे या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांचाच शोध सुरु झाला आहे. सदर पालघर येथील व्यक्ती ही १७ मार्च पर्यंत कामाला येत होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात ही माहिती समजताच महापौर म्हस्के यांनी संबधींत कंपनीतील कामगारांची यादी मागवून घेतली असून ती पालिकेच्य स्वोाधीन केली आहे. या यादीत ११० जणांचा समावेश असून आता त्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने टीम तयार केल्या आहेत. हे ११० कामगार ठाण्यातील हाजुरी, कळवा, किसननगर, पोखरण रोड. २, अंिबका नगर, आनंद नगर, वागळे इस्टेट आदींसह इतर भागात वास्तव्यास असून आता त्यांचा शोध सुरु झाला आहे. तर काही कामगार हे नवीमुंबईतील तर काही नाहुर, मुलुंड भागातील असल्याची माहितीही महापौरांनी दिली. त्यातील बहुतेक कामगार हे झोपडपटटी भागात राहणारे असल्याने आता पालिकेची या सर्वांना शोधण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या