CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:43 AM2020-09-16T01:43:26+5:302020-09-16T01:45:53+5:30

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे.

Search for 1600 corona patients in Thane district; Health department information | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ६०० रुग्णांचा शोध मंगळवारी घेण्यात आला. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ४९ हजार ४४० रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तीन हजार ९८३ मृतांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून उघड झाली.
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ३९६ रुग्ण नव्याने आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ७३९ झाली. उल्हासनगरला ३० रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात आतापर्यंत आठ हजार ३४९ बाधितांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्यामुळे २५५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३५ रुग्ण नव्याने सापडले आहेत.
मीरा-भार्इंदरमध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथ शहरात ६० रुग्ण आढळून आले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार ५८६ बाधित तर २०९ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ८१ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण पाच हजार १६७ झाले आहेत.

नवी मुंबईत ४०५ रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई : शहरात दिवसभरात ४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल २७१८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के झाले आहे. नवी मुंबईमध्ये मंगळवारी ३११ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३१३१६ झाली आहे. शहरात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६८ दिवसांवर पोहचले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

वसई-विरारमध्ये २६८ नवे रुग्ण
वसई : वसई-विरार शहरात मंगळवारी नालासोपारा शहरात दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर बाधित रुग्णसंख्या २६८ ने वाढली. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात २०७ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७९९ वर पोहोचली असून वसई-विरार २० हजारच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.

रायगडमध्ये ६४६ नव्या रु ग्णांची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी ६४६
नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची
नोंद झाली आहे. त्यामुळे
बाधितांची संख्या ३८ हजार ४१९ वर पोचली आहे.
दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०३७ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३० हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Search for 1600 corona patients in Thane district; Health department information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.