शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शाळकरी विद्यार्थ्‍यांनी भिंतीना दिला सप्‍तरंगी साज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:19 IST

स्‍वच्‍छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्‍यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. 

कल्‍याण  - स्‍वच्‍छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्‍यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. या उपक्रमांस आज पासून शहरातील विविध दुर्लक्षित भिंतीवर स्‍वच्‍छ सर्वेक्षणाचा संदेश देणारा सप्‍तरंगी साज चढवला जात आहे. या भिंती रंगविण्‍यात विद्यार्थी देखली चांगलेच रमल्‍याचे दिसून आले.

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या वतीने स्‍वच्‍छ सर्वेक्षण -२०१८ या उपक्रमांतर्गत ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करुन ओल्‍या कच-यापासून कंपोस्‍ट खत तयार करणे, नागरिकांमध्‍ये जनजागृती करण्‍यासाठी विविध स्‍तरातील नागरिक, सामाजिक संस्‍था, शाळा महाविद्यालयांना सहभागी करुन घेणे, स्‍वच्‍छ सर्वेक्षणासाठी शहर आणि प्रभाग निहाय स्‍वच्‍छता दुत नेमणे, मोबाईल अॅपद्वारे क‍च-याची तक्रार करण्‍यासाठी नागरिकांमध्‍ये जागृती करणे. रॅली काढणे, सभा घेणे, पत्रके वाटणे असे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. यामध्‍ये आयुक्‍त पी. वेलरासू यांनी चांगला पुढाकार घेवून आपल्‍या अधिकारी व कर्मचा-यांना या कामात सहभागी करुन घेतले आहे.या उपक्रमाचा एक भाग म्‍हणून महापालिकेने शाळेतील विद्यार्थ्‍यांना महापालिका शाळा व परिसरातील ओस पडलेल्‍या व दुर्लक्षित भिंतींना नवसंजीवनी देण्‍यासाठी भिंतीवर स्‍वच्‍छ सर्वेक्षणाबाबत जनजागृतीपर भिंती चित्र काढण्‍याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.परिसरातील विविध भिंतीना पालिकेतर्फे व्‍हाईटवॉश करुन देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे या भिंतीना नवा साज चढवण्‍यात विद्यार्थ्‍यांनाही उत्‍साह आला आहे. विशेष म्‍हणजे ठाकूरवाडी, डोंबिवली पश्चिम येथील संवाद कर्णबधीर शाळेतील मुलांनी देखिल भिंतीचित्रे रेखाटली आहेत. विद्यार्थ्‍यांच्‍या या आगळया वेगळया उपक्रमाचे कौतुक आयुक्‍त पी.वेलरासू यांनी केले आहे.महापालिका क्षेत्रातील तब्‍बल ५६ शाळेतील एकूण ३८४ विद्यार्थी व ५६ शिक्षकांनी स्‍वच्‍छ सर्वेक्षण भिंती चित्र उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या भिंती चित्र उपक्रमात सहभागी झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना महापालिकेच्‍या वतीने प्रमाणपञ दिले जाणार असुन, पहिल्‍या,दुस-या व तिस-या क्रमांकाने उत्‍तीर्ण होणा-या विदयार्थ्‍यांना महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्‍त पी. वेलरासू यांचे हस्‍ते गौरविण्‍यांत येणार आहे. हा अनोखा उपक्रम यशस्‍वी करण्‍यांसाठी घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाbचे उपायुक्‍त धनाजी तोरस्‍कर, शिक्षण विस्‍तर अधिकारी विजय सरकटे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान