शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग

By अजित मांडके | Updated: January 3, 2024 15:57 IST

'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत

ठाणे :  शहरातील असलल्या वृक्षांची माहिती ठाणेकरांना सहज कळावी, किंवा वृक्ष कोणत्या प्रजातीचे आहे, याची माहिती मिळावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहितीसाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचे उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती यांनी सांगितले. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदेर्शानुसार महापालिकेची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहेत. त्यानुसार, 'चला वाचूया' या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली.

प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सुमारे २००० झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. त्या २००० हून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आले आहेत. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, असेही संचेती यांनी स्पष्ट केले.

अशी मिळेल माहितीझाडावर लावण्यात आलेल्या क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोन मध्ये स्कॅनरवर स्कॅन करायचा.क्यू आर कोड स्कॅन केल्यावर विकिपीडिया या वेबसाईट वरील लिंक उघडेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या झाडाची माहिती मिळेल.ही माहिती मराठी व इंग्रजीत मिळू शकेल.माहितीमध्ये झाडाचे नाव, बॉटनिकल नाव, झाडांचे वैशिष्ट्य, उत्पत्तीस्थान आदींचा समावेश आहे.

कोणत्या उद्यानात क्यू आर कोडमाजिवडा - मानपाडा - ट्रॅफिक पार्क, कै. शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यान.वर्तक नगर - कै. प्रमोद महाजन निसर्ग उद्यान, कै. वसंतराव डावखरे उद्यानवागळे इस्टेट - हँगिंग गार्डन, लोकमान्य नगर - सावरकर नगर, कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानउथळसर - कचराळी तलाव उद्यान, ब्रम्हाळा तलाव उद्यान, वृंदावन सोसायटी उद्याननौपाडा - कोपरी - लोकमान्य टिळक उद्यान, दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र, श्री गणेश उद्यान, कै. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, राम गणेश गडकरी रंगायतन उद्यान, दादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यानकळवा - नक्षत्र वन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उद्यान, कै. मुकुंद केणी क्रीडा संकुल, खारेगाव तलावदिवा - खिडकाळी तलावमुंब्रा - राऊत उद्यान

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका