सव्वा लाखाच्या ऐवजाची चोरी
By Admin | Updated: December 26, 2015 00:39 IST2015-12-26T00:39:57+5:302015-12-26T00:39:57+5:30
वर्तकनगर भागातील दोन हॉटेलसह चार दुकाने फोडून चोरट्यांनी एक लाख २९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २३ आणि २४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस

सव्वा लाखाच्या ऐवजाची चोरी
ठाणे : वर्तकनगर भागातील दोन हॉटेलसह चार दुकाने फोडून चोरट्यांनी एक लाख २९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २३ आणि २४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ डिसेंबरच्या रात्री ११ ते २४ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हे प्रकार घडले. मॉन्जिनिज केक शॉपमधून ६८ हजारांची रोकड, निसर्ग हॉटेल येथून ५० हजार ८०० ची रोकड आणि दोन हजारांचा मोबाइल, रुणवाल प्लाझा येथील ‘शबरी हॉटेल’मधून तीन हजार रुपये रोख तर रुणवाल मेडिकोतून सहा हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.जे. चव्हाण या अधिक तपास करीत आहेत.