पालघरमधील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:45 AM2020-08-10T00:45:40+5:302020-08-10T00:45:44+5:30

धामणी, कवडास, वांद्री, कुर्झे भागांत या वर्षी सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता

Satisfactory rainfall in the dam area of Palghar | पालघरमधील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

पालघरमधील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

googlenewsNext

पालघर : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. आदिवासी भागात सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या धामणी, कवडास, वांद्री व कुर्झे या भागांतले सिंचन क्षेत्र वाढणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. सूर्या धरण ६६ टक्के तर कवडास व वांद्री धरण १०० टक्के आणि कुर्झे धरणात ८८.३२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आणल्या जात असलेल्या धामणी धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर आहे, तर येथील उपयुक्त पाण्याचा साठा २७६.३४९ दलघमी इतका आहे.

या धरणाची रविवारी पाण्याची पातळी १११.८० मीटर इतकी पोचली असून धरणात सध्या १९२.१५ दलघमीपैकी उपयुक्त पाण्याचा साठा १८३.०५५ दलघमी असून धरण ६६.२४ टक्के भरले आहे. या धरण क्षेत्रात रविवारी ४३.०० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात ११७५.०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या धरणातील पाणी पालघर आणि डहाणू तालुक्यातील सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरण्यात येत असते.
धामणी धरण्याच्या खालच्या बाजूला कवडास धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ६५.२५ मीटर इतकी असून सध्या ९.९६० दलघमी पाणीसाठा आहे. धरणात आजची पाण्याची पातळी ६५.५० मीटर इतकी असून पाण्याचा साठा १३.७०० दलघमी झाला आहे, त्यातील उपयुक्त पाणीसाठा ९.९६० दलघमी असून येथील टक्केवारी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के झाली आहे.

या धरण क्षेत्रात रविवारी ४३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या सांडव्यातून १५१४. क्यूसेक्स पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. या धरणातील पाणीचा वापर पालघर, डहाणू, वसई तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे.

पालघर व वाडा तालुक्याच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या वांद्री नदीवरील धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ४३.६० मीटर असून या धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ३५.९३८ दलघमी इतका आहे. धरणातील आजची पाण्याची पातळी ४३.५७ मीटर एवढी आहे, तर पाण्याचा आजचा साठा ३६.९८४ मीटर आहे. या धरणातील उपयुक्त साठा ३५.८१४ दलघमी असून धरण १०० टक्के भरले आहे. आज धरण क्षेत्रात ४४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ जूनपासून या धरण क्षेत्रात १७२३ मिमी पाऊस झाला आहे.

कुर्झे धरणाची पाण्याची पातळी ७०.४० मीटर इतकी असून पाण्याचा उपयुक्त साठा ३९.०५ दलघमी आहे. धरणातील आजची पाण्याची पातळी ६७.९५ मीटर आहे, तर आजचा पाणीसाठा ३५.३८ दलघमी असून उपयुक्त पाणी साठा ३४.४९९ दलघमी आहे. या धरणात आजपर्यंत ८८.३२ टक्के पाणी साठले आहे, तर १ जूनपासून या धरण क्षेत्रात ७०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणातील पाणी
सिंचन व पिण्याच्या वापरासाठी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या
जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन नद्यांमध्ये सूर्या, वैतरणा व पिंजाळ या नद्यांच्या समावेश असून सूर्या नदीची पाणीपातळी ३.७४ मीटर आहे. या नदीच्या पाण्याच्या पातळीचा इशारा ११ मीटरचा असून धोक्याची पातळी १२.१० मीटरवर आहे, तर वैतरणाची पाणीपातळी ९९.७० मीटर असून इशारा पातळी १०१.९० मीटर तर धोक्याची पातळी १०२.१० मीटर आहे. वाडातील पिंजाळ नदीची पाणीपातळी १००.०५ मीटर असून इशारा पातळी १०२.७५ मीटर इतकी आहे.

Web Title: Satisfactory rainfall in the dam area of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.