शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस भौगोलिकदृष्ट्या विस्तारली तरच आगामी काळात भाजपला सक्षम पर्याय उभा राहील, संजय राऊत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 22:27 IST

Sanjay Raut News: काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्टया विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे,तरच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे  विधान जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले.

ठाणे -  काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्टया विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे,तरच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे  विधान जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले. त्याचवेळी आगामी काळात लोकसभेसह सर्वच निवडणूका या भाजपला सोप्या राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटयगृहात पार पडले. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला.  ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला एक मोठा इतिहास आहे. मात्र, त्यांना केवळ भूगोल राहिलेला नसून तो त्यांनी वाढविला पाहिजे. उत्तरप्रदेश किंवा इतर राज्यात निकाल पाहता काँग्रेसला या देशामध्ये स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे, तरच २०२४ मध्ये काँग्रेस समर्थ पर्याय देऊ शकतो. तत्पूर्वी, प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या परिसंवादामध्ये त्यांनी शाखा आरएसएस आणि शिवसेनेच्याही वाढत आहेत, असे म्हटले होते. त्यावर भाष्य करतांना ते म्हणाले, शिवसेनेची शाखा आपोआप भरते. संघासाठी माणसे तयार केली जातात. तसेच शिवसेनेच्या शाखेमार्फत समाजकार्य केले जाते. लोकांची कामेही होत आहेत, असा दावाही केला. योगी यांना उत्तरप्रदेशात नायकाचा दर्जा दिला गेला, या प्रश्नावर ते म्हणाले, योगी हे मोठे नेते असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.  दिल्लीतील निवडणूका या भाजपने लांबणीवर टाकल्याचा आरोप आपने केल्याबाबत राऊत म्हणाले, संपूर्ण देशातच महापालिकेच्याच नव्हे तर सर्वच निवडणूका या भाजपला सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक भीती निर्माण झालेली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरु तसेच  कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, जेष्ठ लेखक भारत सासणे आणि वरिष्ठ निवेदक मिलिंद भागवत आदी उपस्थित होते. यावेळी प्राप्तकाल कादंबरीच्या अनुषंगाने लेखक तथा जेष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी मान्यवरांशी संवाद साधला. पुतिनने काय केले पाहिजे हे कोकणातला माणूसच सांगू शकतो, असेही प्राप्तकालच्या अनुषंगाने रंगलेल्या परिसंवादामध्ये राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा