संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश

By अजित मांडके | Updated: May 3, 2024 01:01 IST2024-05-03T01:00:11+5:302024-05-03T01:01:21+5:30

अखेर संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याचा मुहूर्त ठरला आहे. ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.

Sanjay Nirupam has decided to join Shinde's Shiv Sena | संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश

संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश

ठाणे : संजय निरुपम यांचे अखेर ठरले. ते शुक्रवारी ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसापूर्वी संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याचा मुहूर्त ठरला आहे. ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.

Web Title: Sanjay Nirupam has decided to join Shinde's Shiv Sena