जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संजय दाभोळकर यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:59 AM2019-05-31T00:59:51+5:302019-05-31T01:00:17+5:30

बदलापूरचे रहिवासी : २० ते २७ ऑक्टोबरदरम्यान युरोपमध्ये स्पर्धा

Sanjay Dabholkar's selection in the World Power Lifting Championship | जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संजय दाभोळकर यांची निवड

जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संजय दाभोळकर यांची निवड

Next

ठाणे : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा जिंकणारे बदलापूरचे रहिवासी आणि ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणाऱ्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. ही स्पर्धा येत्या २० ते २७ आॅक्टोबर २०१९ रोजी युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस, डेडलिफ्ट ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये दाभोळकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

८२.५ ते ९० किलो वजनी गटात दाभोळकरांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंचप्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. हरियाणामधील सोनिपत येथे युरोपमध्ये जाणाºया खेळाडूंची निवड झाली. तर, नॅचरल स्ट्राँग पॉवर लिफ्टिंग फेडरेशनअंतर्गत २६ मे २०१९ रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षातही तरुणाला लाजवेल, असा परफॉर्म करून ८२.२ किलो वजनी गटात निवड झाली आहे. तत्पूर्वी नाशिकमध्ये ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्ट्र टायटल’ हा किताब पटकावला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दाभोळकर यांनी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरात येथील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

‘महाराष्ट्र टायटल’
नाशिकमध्ये ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्ट्र टायटल’ हा किताब पटकावला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याचबरोबर विविध राज्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत दाभोळकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: Sanjay Dabholkar's selection in the World Power Lifting Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.