जेसलपार्क येथे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:36+5:302021-07-26T04:36:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : कांदळवन दिनाचे औचित्य साधून शासनाच्या वन विभागाने रविवारी सकाळी भाईंदर पूर्वेला जेसलपार्क खाडी ...

Sanitation campaign at Jesalpark | जेसलपार्क येथे स्वच्छता अभियान

जेसलपार्क येथे स्वच्छता अभियान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : कांदळवन दिनाचे औचित्य साधून शासनाच्या वन विभागाने रविवारी सकाळी भाईंदर पूर्वेला जेसलपार्क खाडी किनारी कांदळवनात स्वच्छता मोहीम राबवली. महापालिका, पोलीस व स्वच्छतादूत यात सहभागी झाले होते.

मीरा-भाईंदरमधील सरकारी जागेतील कांदळवन क्षेत्र शासनाच्या वन विभागाच्या कांदळवन कक्षाला वन कायद्याखाली हस्तांतरित करण्यात आले आहे. २६ जुलै हा कांदळवन दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्यानिमित्ताने रविवारी सकाळी कांदळवन कक्षाच्या वतीने जेसल पार्क येथील कांदळवनात साफसफाईचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वनक्षेत्रपाल चेतना शिंदे, नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवान पाटील, वनपाल सचिन मोरे, स्वच्छता निरीक्षक रमेश घरत, फ्युचर फॉर इंडियाचे हर्षद ढगे व सहकारी, सोशल शेडचे ऋषिकेश मोहिते व सहकारी, पेणकरपाडा गावचे भाविक पाटील व ग्रामस्थ, निवृत्त पालिका अधिकारी विजय पाटील, अनिल यादव, कांदळवन कक्ष कर्मचारी व पालिका सफाई कामगार आदींनी कांदळवन व चिखलात उतरून सफाई केली.

कांदळवनात मोठ्या प्रमाणात अडकलेले प्लास्टिक, कपडे, फ्रेम आदी कचरा काढण्यात आला. यावेळी चेतना शिंदे यांनी कांदळवनाचे महत्त्व सांगत यापुढे नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जाईल, असे सांगितले. नागरिकांनी प्लास्टिक व अन्य कचरा, निर्माल्य कांदळवन क्षेत्रात टाकू नये, कांदळवन तोडू नये, भराव- बांधकाम करू नये, असे आवाहन वन विभाग, पोलीस व महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Sanitation campaign at Jesalpark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.