संघर्ष यात्रा ठाण्यात धडकणार; जंग्गी स्वागताची तयारी
By सुरेश लोखंडे | Updated: November 23, 2023 17:42 IST2023-11-23T17:41:38+5:302023-11-23T17:42:45+5:30
राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू करण्यात येँणार आहे.

संघर्ष यात्रा ठाण्यात धडकणार; जंग्गी स्वागताची तयारी
ठाणे : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने भाजप हटाव देश बचाव - जनविरोधी सरकार हटाव - महाराष्ट्र बचाव, ही राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणच्या जिल्ह्यातून येत असलेली संघर्ष यात्रा १८ डिसेंबरपर्यंत आहे. २४ नोव्हेंबर रोजी ही यात्रा ठाणे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ धडकणार आहे. तिच्या स्वागतासाठी ट्रेड युनियनच्या ठाणे जिल्हा कौन्सिलकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे.
कोल्हापूर येथून निघालेली संघर्ष यात्रा नागपूरपर्यंत जाणार आहे. या मार्गातील ठाणे शहरात शुक्रवारी ही यात्रा येत असून, त्याचे स्वागत करण्यात येत आहे. कामगार, कर्मचारी, शिक्षक, शेतकरी जनविरोधी सरकारी धोरणाच्या विरोधातील या जनजागरण संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेच्या स्वागतासाठी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. एम. ए. पाटील, वर्कर्स फेडरेशनचे कॉ. कृष्णा भोयर आदी उपस्थित राहणार आहेत.