दिघा पोटनिवडणुकीत संध्या यादव विजयी

By Admin | Updated: April 19, 2016 01:57 IST2016-04-19T01:57:04+5:302016-04-19T01:57:04+5:30

दिघा प्रभाग क्रमांक ६ मध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या संध्या यादव यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मधुमती पाल

Sandhya Yadav won in Digh bye election | दिघा पोटनिवडणुकीत संध्या यादव विजयी

दिघा पोटनिवडणुकीत संध्या यादव विजयी

नवी मुंबई : दिघा प्रभाग क्रमांक ६ मध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या संध्या यादव यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मधुमती पाल यांचा ७८६ मतांनी पराभव केला आहे. संध्या यादव यांना २४३४ तर मधुमती पाल यांना १६४८ मते पडली.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या प्रभागात रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरु द्ध इतर सर्व पक्ष अशी लढत होती.
काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा आदी प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार न देता मधुमती पाल या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. यामुळे रविवारी सकाळपासूनच प्रभागात तणावाची परिस्थिती होती. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली होती.

Web Title: Sandhya Yadav won in Digh bye election