शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

तहानलेल्या ठाण्याच्या जखमेवर चोळले मीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:12 IST

मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर अशी सर्वच शहरे भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना ३० हजार कोटी रुपयांची धरणे ठाणे जिल्ह्यात बांधून येथील लोकांना तहानलेले ठेवण्याचा गडकरी यांचा उफराटा न्याय कमालीचा अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे.गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयाने पाणीटंचाईवरून ‘ठाणे जिल्ह्याचा मराठवाडा करणार का’, असे गंभीर भाष्य करून घोडबंदर पट्ट्यातील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. आता त्याच ठाणे जिल्ह्यावर गडकरी हे नाशिक-अहमदनगर या दोन जिल्ह्यांची तहान भागवण्याची जबाबदारी ढकलत आहेत.सर्वच राज्यकर्त्यांनी पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला सापत्न वागणूक दिली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यांसह महानगरांना तहानलेले ठेवून मुंबईतील उत्तुंग टॉवर्संना मुबलक पाणी देण्यात येत असल्याने नागरिकांत संताप असताना गडकरी यांनी जिल्ह्यातील एक कोटी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.ठाण्यात प्रचंड नागरिकीकरण होत आहे. शंभरच्या आसपास गावांतील शेती नष्ट होऊन औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे सिमेंटचे जंगल वाढले आहे. सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांची पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड-टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. वाढते शहरीकरण आणि नव्याने होणाºया उत्तुंग वसाहतींमुळे या परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. येथील राज्यकर्ते मात्र सुसरी, मुमरी, शाई, काळू, धरणाचे स्वप्न दाखवत आहेत. त्यासाठी २० वर्षांत त्यांना जमीन संपादित करता आलेली नाही. यामुळे ठाण्याचा मराठवाडा करणार का, ही न्यायालयाने व्यक्त केलेली भीती रास्त आहे.ठाणे जिल्ह्यावरअत्याचाराचा कहर / पान ३>संभाव्य जलस्रोतमुंबई महानगर प्रदेशाची भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही जलसंपदा विभागाची प्रस्तावित धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आकार घेणार असून त्यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन जाणार आहे. हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून लक्षावधी वृक्षांची कत्तल होणार आहे. हा सर्व आघात ठाणे-पालघर जिल्ह्यांवर होणार असून केंद्रीय मंत्री गडकरी ठाणेकरांना तहानलेले ठेवून नाशिक-अहमदनगरसाठी नव्या धरणांची काळजी वाहू लागले आहेत. ब्रिटिशकाळापासून मुंबई शहराची तहान ठाणे जिल्हा भागवत आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरलेली, पण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला, मुले हंडे-कळशा घेऊन पाण्याकरिता वणवण करत असल्याचे चित्र कित्येक वर्षे दिसत आहे. नितीन गडकरींच्या घोषणेनुसार ३० हजार कोटी रुपये खर्च करून नवी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधल्यानंतर स्थानिकांना पाण्याकरिता वणवण करावीच लागणार, हे निश्चित आहे.