साहित्य गौरव ग्रंथालय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST2021-02-23T05:00:06+5:302021-02-23T05:00:06+5:30

कॅप्टन आशिष दामले आणि ग्रंथमित्र श्याम जोशी यांच्या पुढाकाराने नव्याने सुरू केलेल्या साहित्य गौरव ग्रंथालयाला खासदार सुळे यांनी ...

Sahitya Gaurav Library Inspirational | साहित्य गौरव ग्रंथालय प्रेरणादायी

साहित्य गौरव ग्रंथालय प्रेरणादायी

कॅप्टन आशिष दामले आणि ग्रंथमित्र श्याम जोशी यांच्या पुढाकाराने नव्याने सुरू केलेल्या साहित्य गौरव ग्रंथालयाला खासदार सुळे यांनी रविवारी भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. श्याम जोशी आणि कॅप्टन आशिष दामले यांनी पुस्तक भेट देऊन सुप्रिया सुळेंचे स्वागत केले. ग्रंथपाल अर्चना कर्णिक यांनी ग्रंथालयाची माहिती उपस्थितांना करून दिली.

वाचन कमी झाल्याने नुकसान होते. ते टाळण्यासाठी वाचन आवश्यक आहे. दामले यांनी सव्वा लाख पुस्तकांचे भव्य वाचनालय सर्वांसाठी खुले केले आहे, हे अतिशय स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ता बाळसराफ, श्रीधर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा संपर्कप्रमुख माजी खासदार आनंद परांजपे, प्रवक्ते महेश तपासे, प्रभाकर पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------

Web Title: Sahitya Gaurav Library Inspirational