कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका

By अजित मांडके | Updated: February 27, 2024 15:13 IST2024-02-27T15:13:29+5:302024-02-27T15:13:38+5:30

हा साप कपाटाच्या अडगळीत होता. यावेळी अनिल कुबल यांनी सापाला पकडून त्याच्या अधिवासात सोडले

Safe release of Dhaman Sapa who came to Kopri Police Station | कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका

कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका

ठाणे : कोपरी पोलीस ठाण्यात शिरलेल्या धामण जातीच्या सापाला ज्येष्ठ सर्पमित्र अनिल कुबल यांनी शिताफीने पकडुन सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. 

मंगळवारी दुपारच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात धामण जातीचा साप आढळून आला. सापाची फारशी माहिती नसल्यामुळे हा साप विषारी तर नाही ना अशी शंका सर्वांना होती. पोलिसांनी तात्काळ ज्येष्ठ सर्पमित्र अनिल कुबल यांच्याशी संपर्क साधला. कुबल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हा साप कपाटाच्या अडगळीत होता. यावेळी अनिल कुबल यांनी सापाला पकडून त्याच्या अधिवासात सोडले

Web Title: Safe release of Dhaman Sapa who came to Kopri Police Station