sadabhau khot views on farmer | माझा शेतकरी राज्याचा कणा--- - सदाभाऊ खोत
नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसानसर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे

ठाणे : माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो कणा मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व या ठिकाणी काम करीत आाहोत आणि या सर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार आहोत, असे सुतोवाच कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यां प्रसंगी रविवारी केले.
     अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची शासनाची भूमिका आहे. या दृष्टÑीकोनातून मुख्यमंत्र्यांसह उद्धवजी आणि सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे आहेत. शेतकऱ्यांना निश्चितपणाने मदत देण्याच्या भूमिकेतून त्यांना धीर देत आहेत. कारण शेवटी माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व काम करीत आहोत आणि त्यातून निश्चितपणाने शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार असल्याचे खोत यांनी या दौऱ्यां प्रसंगी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
        भिवंडी तालुक्यातील महापोली,पालखणे, सुर्यानगर, विश्वगड, झिडके येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी खोत यांनी केली. कृषी अधिकारी, तलाठी, कृषीसेवक, तालुका प्रशासनास आदीं यंत्रणांनी लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. भिवंडी कृषी उत्पन्न बाज़ार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत बैठक घेउन संवाद साधला आणी शेतकऱ्यांना धीर देत मदतीच्या आश्वासनांचा दिलासा दिला.
       परतीच्या पावसाने शेतकºयांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्धवस्त झाले आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी यावेळी जारी केले.
      यावेळी आमदार शांताराम मोरे, ठाणे ज़िल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती दीपाली पाटील, शिवसेनेचे ग्रामीण ज़िल्हा प्रमुख प्रकाश पाटील, विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील, ज़िल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, पंचायत समिति सभापती ज्योती ठाकरे, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
............
फोटो - ०३ठाणे सदाभाऊ खोत

Web Title: sadabhau khot views on farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.