सामूहिक बलात्काराचा बनाव : कर्नाटकच्या तिन्ही कथित आरोपींचा 23 जुलैला ठाण्यात नसल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:04 IST2017-07-26T23:04:04+5:302017-07-26T23:04:04+5:30

तेलंगणातील रहिवासी व्यंकटेश रेड्डी तसेच कर्नाटकातील शिरसप्पा आणि रंगप्पा या तिघांनीही आपल्यावरील आरोपांचा साफ इन्कार केला.

saamauuhaika-balaatakaaraacaa-banaava-karanaatakacayaa-tainahai-kathaita-araopaincaa-23-jaulaailaa | सामूहिक बलात्काराचा बनाव : कर्नाटकच्या तिन्ही कथित आरोपींचा 23 जुलैला ठाण्यात नसल्याचा दावा

सामूहिक बलात्काराचा बनाव : कर्नाटकच्या तिन्ही कथित आरोपींचा 23 जुलैला ठाण्यात नसल्याचा दावा

ठाणे, दि. 26 - कळव्याच्या घोलाईनगर येथील कथित सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील कथित आरोपी व तेलंगणातील रहिवासी व्यंकटेश रेड्डी तसेच कर्नाटकातील शिरसप्पा आणि रंगप्पा या तिघांनीही आपल्यावरील आरोपांचा साफ इन्कार केला. ठाणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन त्यांचे जाबजबाब नोंदवले.
घोलाईनगर भागात राहणा-या एका महिलेने २३ जुलै रोजी सहा जणांच्या टोळक्यापैकी दोघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. कालांतराने हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले होते. मात्र, तत्पूर्वी बलात्काराच्या गुन्ह्याकरिता तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडीही दिली होती.
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाने २५ जुलै रोजी कर्नाटक येथे जाऊन शिरसप्पा आणि रंगप्पा यांची चौकशी केली. दि. २३ जुलै रोजी आपण कर्नाटकातील आपल्या गावात असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पवार यांच्या पथकाने त्याची खातरजमा केली. बुधवारी तेलंगणा येथील व्यंकटेश रेड्डी याचीही चौकशी केली. आपण गेल्या काही दिवसांमध्ये ठाण्यात गेलोच नसल्याचे स्पष्ट केले. या तिघांचेही २३ जुलै रोजीचे मोबाइल लोकेशन स्थानिक पोलिसांच्या मदतीने यापूर्वीच पडताळून पाहण्यात आले होते. न्यायालयास ही माहिती सादर केल्यानंतर त्या महिलेची जबानी पुन्हा ठाणे न्यायालयापुढे नोंदवली जाणार असून त्यानंतरच या प्रकरणावर पडदा पडेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: saamauuhaika-balaatakaaraacaa-banaava-karanaatakacayaa-tainahai-kathaita-araopaincaa-23-jaulaailaa