नाट्यगृह, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:55+5:302021-03-23T04:42:55+5:30
ठाणे : शहरात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने ठाणे महापालिकेने शहरातील नाट्यगृह, सिनेमागृह आणि खासगी आस्थापनांसाठी पुन्हा आदेश काढले आहेत. ...

नाट्यगृह, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने चालवा
ठाणे : शहरात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने ठाणे महापालिकेने शहरातील नाट्यगृह, सिनेमागृह आणि खासगी आस्थापनांसाठी पुन्हा आदेश काढले आहेत. नाट्यगृहात आणि सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावीत, मास्कशिवाय कोणाला प्रवेश देऊ नये, शरीराचे तापमान मोजावे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक तसेच नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासून ठाण्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ठाण्यात रविवारी ६३८ रुग्ण आढळले आहेत. मार्चमध्ये रोजच्या रोज ४०० ते ६०० रुग्ण सापडत होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध स्वरूपाचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार नाट्यगृह आणि सिनेमागृहे केवळ ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तेथे येणाऱ्यांना मास्कशिवाय प्रवेश देऊ नये, प्रवेशाच्या वेळेस तापमान तपासूनच प्रवेश द्यावा, तापाची लक्षणे असल्यास प्रवेश देऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचनाही केल्या आहेत. याशिवाय खासगी आस्थापनाही ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिफ्टनुसार बोलवावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
-----------------