सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने रसिक खूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:52 IST2018-02-23T23:52:25+5:302018-02-23T23:52:25+5:30

Ruksak happy with Surekha Punekar's performance | सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने रसिक खूष

सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने रसिक खूष

बदलापूर : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बदलापूर महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.
कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीलाच प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. पुणेकर यांच्यासह त्यांच्या सहकलाकारांनी देखील लावणी सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एकापेक्षा एक बहारदार लावणी सादर करुन कार्यक्रमाची रंजकता वाढवत नेली.
लावणीसोबत मराठी गीतांवरही नृत्य सादर करण्यात आले. तब्बल तीन तास हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान बदलापूरमधील १० समाजातील अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. सर्व समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमाला आयोजक वामन म्हात्रे, उद्योजक डी.एम.भोईर, प्रकाश पाटील, सूरदास पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Ruksak happy with Surekha Punekar's performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.