शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘आरटीई’च्या नियमावलीचे शाळा पालन करणार? पालकांविना उरकली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 01:16 IST

आरटीईअंतर्गत प्रवेश दिल्यानंतरही केडीएमसी हद्दीतील काही शाळा पालकांकडून शैक्षणिक शुल्क मागत आहेत.

कल्याण - आरटीईअंतर्गत प्रवेश दिल्यानंतरही केडीएमसी हद्दीतील काही शाळा पालकांकडून शैक्षणिक शुल्क मागत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शालेय सुविधा व गणवेश नाकारत असल्याने याविरोधात पालकांनी आवाज उठवला होता. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक शनिवारी घेण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात ही बैठक शुक्रवारीच उरकण्यात आली. बैठकीस आम्हालाही बोलवावे, अशी पालकांची मागणी असतानाही शिक्षण विभागाने त्यांना बोलावले नाही. दरम्यान, मुख्याध्यापकांना आरटीई कायद्याचे पालन करण्यासाठी नियमावलीचे केवळ एक पत्र देण्यात आले. शाळा या नियमावलीचे कितपत पालन करेल, याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.आरटीईअंतर्गत मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश आरक्षित आहे. या कायद्यांतर्गत शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असला, तरी सोयीसुविधा नाकारल्या आहेत. तसेच शुल्काची मागणी होत आहे. याप्रकरणी पालकांनी पोलिसात धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दम भरला. त्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांची बैठक शनिवारी होईल, असे सांगितले होते. यावेळी पालकांनाही बोलावण्याची मागणी शिक्षण अधिकार, आरोग्य मंचाचे जिल्हाध्यक्ष नितीन धुळे यांनी केली. मात्र, पालकांना अंधारात ठेवून शुक्रवारीच ही बैठक उरकण्यात आली. यावेळी शाळा मुख्याध्यापकांना आरटीई नियमावलीची माहिती समजावून सांगितली असून त्याचे पालन करण्याची सूचना दिल्याचे शिक्षण प्रशासकीय अधिकारी तडवी म्हणाले.धुळे यांनी सांगितले की, ज्या शाळा आरटीईला जुमानत नाही, त्यांना किमान कारणे दाखवा नोटीस बजावणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने एकाही शाळेला नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळा नियमांची अंमलबजावणी करतील, असा दावा प्रशासनाने कसा केला? शाळांनी अंमलबजावणी केली असती, तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळच आली नसती.शैक्षणिक शुल्काचा पैसा जातो कुठे?शिक्षणाच्या बाजारीकरणाचे गणित मांडताना धुळे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा ८५ ते ९० हजार रुपये प्रति विद्यार्थ्यामागे शैक्षणिक शुल्क घेतात. एका शाळेत जवळपास ९२० विद्यार्थ्यांचा पट गृहीत धरल्यास किमान व जास्तीतजास्त शैक्षणिक शुल्काच्या रकमेचा सुवर्णमध्य काढल्यास प्रति विद्यार्थी शैक्षणिक शुल्क ८५ हजार रुपये आहे. त्यामुळे वर्षाला शाळेला ९२० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटी नऊ कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळते. मग, २५ टक्के आरक्षित असलेल्या विद्यार्थ्यांवर खर्च करण्यास शाळा नकार का देत आहेत? शाळा त्यांची जबाबदारी नाकारत आहेत. कायदाही जुमानत नाहीत.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत नाही. काही शाळांमध्ये सातआठ हजार रुपये वेतनावर शिक्षकांना राबवून घेतले जाते. मग, या शाळांना शैक्षणिक शुल्कापोटी मिळणारा पैसा जातो तरी कुठे, असा सवाल धुळे यांनी केला आहे.काही शाळा शैक्षणिक सोयीसुविधा व साहित्य नाकारत आहेत. पैशांची मागणी करत आहेत. मात्र, बिर्ला स्कूलसारखी शाळा आरटीई प्रवेशांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे पाच जोड आणि बुटाचे तीन जोड, आदी साहित्य कोणतीही तक्रार न करता पुरवत आहे. अन्य शाळांनीही त्यांचा आदर्श घेण्याची गरज धुळे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्र