RPI activists oppose Shiv Sainiks in front of Thane Municipal Corporation to celebration with banjo | ठाणे महापालिकेसमोर बँन्ड वाजविणाऱ्या शिवसैनिकांना आरपीआय कार्यकर्त्यांनी रोखलं 
ठाणे महापालिकेसमोर बँन्ड वाजविणाऱ्या शिवसैनिकांना आरपीआय कार्यकर्त्यांनी रोखलं 

ठाणे - ठाणे महापालिकेत अशोक वैती आज सभागृह नेते पदाचा कार्यभार हाती घेणार होते, त्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे हे पालिकेत येणार आहेत. त्यानिमित्ताने पालिका मुख्यालयाच्या गेटसमोर कार्यकर्त्यांकडून बॅन्जो वाजवून आनंद व्यक्त करण्यात येत होता. मात्र महापरिनिर्वाण दिन असताना बॅन्जो वाजविण्यात आरपीआय कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. 

आरपीआय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून बॅन्जो बंद केला. त्यानंतर पोलिसांनी बॅन्जो जप्त करुन बंदोबस्त वाढविला. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आरपीआय कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले. 
 

Web Title: RPI activists oppose Shiv Sainiks in front of Thane Municipal Corporation to celebration with banjo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.