ठाणे महापालिकेसमोर बँन्ड वाजविणाऱ्या शिवसैनिकांना आरपीआय कार्यकर्त्यांनी रोखलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:39 IST2019-12-06T13:38:29+5:302019-12-06T13:39:07+5:30
आरपीआय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून बॅन्जो बंद केला.

ठाणे महापालिकेसमोर बँन्ड वाजविणाऱ्या शिवसैनिकांना आरपीआय कार्यकर्त्यांनी रोखलं
ठाणे - ठाणे महापालिकेत अशोक वैती आज सभागृह नेते पदाचा कार्यभार हाती घेणार होते, त्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे हे पालिकेत येणार आहेत. त्यानिमित्ताने पालिका मुख्यालयाच्या गेटसमोर कार्यकर्त्यांकडून बॅन्जो वाजवून आनंद व्यक्त करण्यात येत होता. मात्र महापरिनिर्वाण दिन असताना बॅन्जो वाजविण्यात आरपीआय कार्यकर्त्यांनी मज्जाव केला.
आरपीआय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून बॅन्जो बंद केला. त्यानंतर पोलिसांनी बॅन्जो जप्त करुन बंदोबस्त वाढविला. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आरपीआय कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले.