शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी फिरता दवाखाना; खासदार व वनरुपी क्लिनीकच्या माध्यमातून सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:30 IST

फिरत्या दवाखानाची दोन पथके कार्यरत

कल्याण- कोरोनाची लागण पसरू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. यावेळी अहोरात्र कर्तव्य बजाविणा:या पोलिसांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्यांनाही कोरोनाची लागण होऊ शाकते. त्यासाठी त्यांची तपासणी होणो आवश्यक आहे. त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारने फिरता दवाखाना आजपासून सुरु करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून कर्तव्य बजावित असलेल्या पोलिसांची तपासणी केली जाणार आहे.

ठाणे शहरापासून हे तपासणी सुरु करण्यात आली आहे. दोन पथके कार्यरत राहणार आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वनरुपी क्लीनिक्सच्या माध्यमातून हा फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. थर्मल स्कॅन मशीनच्या माध्यमातून शरीरातील तापमानाची चाचणी केली जाणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील नितीन कंपनीनजीक बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांच्या शरीराचे तापमान जास्त असल्याचे तपासणीतून दिसून आले. त्याना चाचणीसाठी रुग्णालयात  पाठविण्यात आले आहे. दोन तपासणी पथके ठाणो ते अंबरनाथ दरम्यान सर्व शहरांसह ग्रामीण भागात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची तपासणी करणार आहेत अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान चार दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत खासदार शिंदे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान कल्याण शीळ रोडवरील नियॉन या खाजगी रुग्णालयाने कोरोना उपचारासाठी सेवा देण्यासाठी पुढाकार दर्शविला होता. आज या रुग्णालयाची खासदार शिंदे यांनी पाहणी केली. या रुग्णालयात सुसज्ज असे 32 बेड्स आहे. तसेच 12 बेड्स हे आयसीयू सुविधांनी सज्ज आहेत. या रुग्णालयासोबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. हे रुग्णालय केवळ कोरोना बाधित रुग्णांना उपचार देणार आहे.

कोरोना बाधितांकरीता महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय आसोलेसन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. मात्र कल्याण ग्रामीण भागात कोरोना उपचारासाठी सोय नसल्याने पडले गावातील नियॉन रुग्णालयात उद्यापासून आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना उपचारासाठी दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसthaneठाणे