शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आता रोबोट करणार वाहतूकीच्या नियमांची जनजागृती

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2019 22:33 IST

ठाणे शहरात एका यांत्रिक रोबोटद्वारे वाहतूक नियमनाचे धडे ठाणेकरांना मिळणार आहे. सोमवारी तीन हात नाका येथे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते या रोबोटचे अनौपचारिक उद्घघाटन झाले आहे.

ठळक मुद्दे ठाणे पोलिसांची अभिनव संकल्पना एका खासगी कपनीच्या मार्फतीने निर्मिती २२ जानेवारीपासून पोलिसांच्या सेवेत होणार दाखल

ठाणे: ठाण्यातील एका खासगी कपनीच्या मार्फतीने निर्मिती केलेल्या यात्रिक रोबोटमार्फतठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आता वाहतूक नियमांची जनजागृती करणार आहेत. येत्या २२ जानेवारी पासून हा रोबोट वेगवेगळया ठिकाणी वाहतूक पोलिसांसमवेत पहायला मिळणार आहे. मुलांमध्ये वाहतूकीच्या नियमांची जागृती होण्यासाठी वेगळया प्रकारे हा उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.एखादी बाब वेगळया प्रकारे मुलांमध्ये किंवा जेष्ठांमध्ये रुजविली तर ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. यासाठी वेगळी कल्पना घेऊन साकारण्यात आलेल्या या यांत्रिक रोबोटमध्ये दोन स्पीकर, डिस्प्ले दिलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांसह मॉलमध्येही तो ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहन परवानाधारक चालकांना तो वाहतूकीचे नियम आपल्या खास शैलीमध्ये सांणार आहे. हे नियम पाळल्यामुळे आपला जीव कसा वाचू शकतो, हे तो सांगणार आहे. यामध्ये हेल्मेट परिधान करण्यापासून ते कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचे धडेही तो देणार आहे. शिवाय, मुलांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्व पटवून देण्याबरोबर वाहतूक चिन्हांचीही तो ओळख करुन देणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या ब्रम्हांड येथील वैद्य यांच्याकडे निर्मिती झालेल्या या अनोख्या राबोटची वाहतूक पोलिसांना चांगलीच मदत होणार असल्याचा विश्वास उपायुक्त काळे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी तीन हात नाका येथे या रोबोटचे लाँचिंग करण्यात आले आहे. मात्र, त्यात पोलिसांना अपेक्षित काही दुरुस्त्या बाकी असल्यामुळे तो २२ जानेवारीपासून ख-या अर्थाने पोलिसांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली........................

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस