म्हाडाने उभारलेल्या कोविड रूग्णालयातील साहित्य पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 11:53 PM2021-04-02T23:53:57+5:302021-04-02T23:54:56+5:30

Robbery : चोरीचा गुन्हा दाखल करणार- डाॅ. जितेंद्र आव्हाड

Robbery was done by the health officials of Sahitya Palika at Kovid Hospital set up by MHADA | म्हाडाने उभारलेल्या कोविड रूग्णालयातील साहित्य पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले लंपास

म्हाडाने उभारलेल्या कोविड रूग्णालयातील साहित्य पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले लंपास

googlenewsNext

ठाणे -  कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती. या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावण्यात आले होते.  मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ.  मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे.  जर, हे साहित्य जसे होते त्या स्थितीत 48 तासात पुन्हा स्थानापन्न केले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती.  मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डाॅ.  मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. 


या प्रकारामुळे डाॅ.  जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी  उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणार्या  डाॅ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे.  
 डाॅ.  आव्हाड यांनी सांगितले की,  कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता , त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे  विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.  ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ मुरूडकर यांनी रूग्णालयातील सुमारे 94 व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत  अशा बेजबाबदार अधिकार्यांला  तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या 48 तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Web Title: Robbery was done by the health officials of Sahitya Palika at Kovid Hospital set up by MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.