उल्हासनगरातील रस्ते दिवाळीपूर्वी होणार सुसाट, दिवस-रात्र रस्ता दुरस्तीचे काम, निधीबाबत साशंकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:59 IST2025-10-14T18:31:22+5:302025-10-14T18:59:48+5:30
Ulhasnagar News: दिवाळीपूर्वी शहरातील रस्ते चकाचक व सुसाट होण्यासाठी दिवस-रात्र रस्ता दुरस्तीचे काम बांधकाम विभागाकडून होत आहे. रस्ता दुरस्तीच्या निधीबाबत शहर अभियंता निलेश शिरसाठे बोलण्यास तयार नसल्याने, रस्ता दूरस्ती व निधी बाबत साशंकता निर्माण झाली.

उल्हासनगरातील रस्ते दिवाळीपूर्वी होणार सुसाट, दिवस-रात्र रस्ता दुरस्तीचे काम, निधीबाबत साशंकता
उल्हासनगर - दिवाळीपूर्वी शहरातील रस्ते चकाचक व सुसाट होण्यासाठी दिवस-रात्र रस्ता दुरस्तीचे काम बांधकाम विभागाकडून होत आहे. रस्ता दुरस्तीच्या निधीबाबत शहर अभियंता निलेश शिरसाठे बोलण्यास तयार नसल्याने, रस्ता दूरस्ती व निधी बाबत साशंकता निर्माण झाली.
उल्हासनगरात बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले. गणेशउत्सव व नवरात्रीउत्सव दरम्यान सतंतधार पाऊस असल्याने, रस्ता दूरस्तीला अडथळा निर्माण झाला. तसेच रस्ते दूरस्तीवर चौफर टिका झाली. गेल्या आठवड्यात आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्ता व चौकाची पाहणी करून रस्ता दुरस्तीचे संकेत दिले होते. दरम्यान महापालिका बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी रस्ता दूरस्ती सुरू केली. काजल पेट्रोल पंप ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता, नेताजी गार्डन परिसर रस्ता, फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक रस्ता आदी अनेक रस्ते दुरस्तीचे काम रात्र दिवस सुरू आहे. राजकीय नेते रस्ता दूरस्ती ठिकाणी उभे राहून शेल्फी काढून कामाचे श्रेय घेण्यासाठी सोशल माध्यमावर फोटो व्हायरल करीत आहेत.
शहरातील वाहतूक सुसाट होण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा (डीपीआर) प्रकल्प अहवाल महापालिकेकडून एमएमआरडीएने मागविला होता. गेल्या वर्षी ५५४ कोटी ५१ लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला पाठविल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे संकेत आमदार कुमार आयलानी यांनी दिली. याव्यतिरिक्त एमएमआरडीएकडून एकून ७ मुख्य रस्ते बांधणी सुरू असून त्यासाठी १५० कोटींची तरतूद आहे. चौकट शहर विकास आराखड्यानुसार रस्तेच नाही* शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार रस्ते बांधणे आवश्यक आहे. मात्र याला उल्हासनगर अपवाद आहे. एमएमआरडीए कडून सुरू असलेल्या एकूण ७ रस्त्याचे काम डीपीनुसार होण्याऐवजी रस्ता जसा तसा रस्ता बांधण्यात येत आहे.