अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी भिवंडी मनपाचा रोड कामगार निलंबित
By नितीन पंडित | Updated: November 20, 2023 19:53 IST2023-11-20T19:53:31+5:302023-11-20T19:53:44+5:30
रविश निसार अंसारी असे निलंबित केलेल्या रोड कामगाराचे नाव आहे.

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी भिवंडी मनपाचा रोड कामगार निलंबित
भिवंडी : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात रोड कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी अटक केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांना माहिती मिळताच त्यांनी चौकशी अंती शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मनपाच्या रोड कामगारास निलंबित केले असल्याची माहिती मनपा प्रशासनाने सोमवारी दिली आहे.रविश निसार अंसारी असे निलंबित केलेल्या रोड कामगाराचे नाव आहे.
भिवंडी महानगर पालिकेच्या आस्थापने वरील वर्ग ३ या संवर्गातील रोड कामगार म्हणून काम करणारा कामगार रविश निसार अंसारी यास अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत आयुक्तांना माहिती मिळताच त्यांनी रविश अंसारी यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९४९ नियम ३ उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यास महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमा नुसार विभागीय चौकशी करणे कामी भिवंडी महानगर पालिका सेवेतून निलंबित केले आहे.