वसईतील रिक्षा चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक; सहा रिक्षा, एक दुचाकी केली जप्त
By नितीन पंडित | Updated: April 28, 2023 17:54 IST2023-04-28T17:53:45+5:302023-04-28T17:54:03+5:30
शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन कडून दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

वसईतील रिक्षा चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक; सहा रिक्षा, एक दुचाकी केली जप्त
भिवंडी : शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन कडून दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन संशयित वंजारपट्टी नाका येथे येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार, पोउप निरी शिंगे,पोलीस उप निरीक्षक चव्हाण, वाघमारे,सपोउपनिरी चौधरी,रामचंद जाधव,तडवी,पोलिस हवालदार साबीर शेख, शिर्के,थोरात,शिंदे,पाटील,पाटील, यादव, पोलिस नाईक साळवी,जाधव,डोंगरे,खताळ,पोलिस शिपाई साळुंखे,सोनावणे, बर्वे, जाधव, इंगले, घरत,साळुंखे या पथकाने सापळा रचून श्रीकांत बाळू बागरवार वय २७, रा.गोरसई व निशांत मंगेश हूकमाळी वय २३ रा. धोंडावडवली या दोघांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या सहा रिक्षा व एक मोटरसायकल अशी ३ लाख ९५ हजारांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
त्यांच्या कडे केलेल्या अधिक चौकशीत या दोघांनी वसई येथील फरार सराईत गुन्हेगार आकाश जयवंत पाटील यांच्या सोबतीने वसई परिसरा मध्ये या रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे.फरार आरोपी आकाश पाटील याच्या विरोधात वसई तालुक्यात विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.