पादचाऱ्याला रिक्षाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:35+5:302021-03-19T04:39:35+5:30

----------------------- मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा डोंबिवली : संतोष पवार यांचे डोके आपटून त्यांना लाथेने मारहाण केल्याच्या आरोपाखाली सुमित आवटे याच्याविरोधात ...

Rickshaw hits pedestrian | पादचाऱ्याला रिक्षाची धडक

पादचाऱ्याला रिक्षाची धडक

-----------------------

मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

डोंबिवली : संतोष पवार यांचे डोके आपटून त्यांना लाथेने मारहाण केल्याच्या आरोपाखाली सुमित आवटे याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी पहाटे ३.४० च्या सुमारास हायलाइट्स लोढा हेरिटेज परिसरातील अलमंडा बिल्डिंगमध्ये घडली.

-----------------------

बॅटरीचोर गजाआड

कल्याण : अरबाज वसीम शेख आणि मुन्शी शरीफोद्दीन या दोघांना बसची बॅटरी चोरताना रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता पश्चिमेकडील फडके मैदानाजवळील फायर ब्रिगेड कार्यालयाजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बसमालक सागर मुंढे यांनी तक्रार दिली आहे.

---------------------------------------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : अमर पाटील यांनी त्यांची दुचाकी सोमवारी संध्याकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान मानपाडा रोडवर ते राहत असलेल्या जयराम निवास येथे उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------

रिक्षाची चोरी

डोंबिवली : पूर्वेकडील आडवली-ढोकळी परिसरात राहणारे दीपक दळवी यांनी त्यांची रिक्षा ते राहत असलेल्या परिसरात शुक्रवारी उभी केली होती. त्या मध्यरात्री रिक्षा चोरीला गेली असून, याप्रकरणी दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------

व्यावसायिकाला मारहाण

डोंबिवली : बांधकाम मटेरियल सप्लायरचा व्यवसाय करणारे आकाश म्हात्रे यांना सागर देसले, अमित गायकवाड आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पूर्वेतील देसलेपाडा येथील गजानन चौक येथे घडली. याप्रकरणी तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

----------------

Web Title: Rickshaw hits pedestrian