शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकांनो ‘प्रवासी ग्राहक देवो भव:’ विद्यार्थ्यांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 18:32 IST

ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे.

कल्याण : ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे. तसेच त्यांनी रिक्षा व रिक्षाचालकांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले.    पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल शाळेतील विद्याथ्र्यानी आज सकाळी कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांना पत्र दिले. कल्याण-डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा. त्यासाठी रिक्षाचालकांच्या माध्यमातून संदेश जावा, रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे ही दिले जावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नगरसेवक आणि रिक्षा टॅक्सी  संघटना अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, आरटीओचे वाहन निरीक्षक जाफर काझी, डी. के . महाले, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संगीता पाटील, शोभा देशमुख, ओमप्रकाश धनविजय, गणोश पाटील आणि रेल्वे पोलिस आधिकारी शिक्षकवर्ग उपस्थित होता.     विद्यार्थिनींनी दिलेल्या पत्रात तुमचा व्यवसाय लोकांच्या सेवाकरिता आहे. तेव्हा लोकांशी अतिशय गोड बोलले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात मग तो डॉक्टर असो किंवा वकील ते आपल्याकडे येणा-या व्यक्तीशी गोड बोलतात. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास तो निर्धास्त होऊन प्रवास करू शकेल. त्यामुळे व्यवसायात भरच पडेल. भाडे नाकरू नका. तीन सीट्सनंतर प्रवाशांना चौथ्या सीटसाठी ताटकळत ठेवू नका. वाढत्या खाजगी वाहनांमुळे व्यवसाय कमी होत आहे. त्यातच रिक्षाचाच वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. भविष्यात या व्यवसायावर गदा येऊ नये म्हणून आतापासूनच विचार करा  या आशयाचे पत्र देण्यात आले.    या आगळ्य़ा वेगळ्य़ा उपक्रमांचे सर्वानी स्वागत करीत एकत्र येऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी वर्गाला दिले. 

टॅग्स :kalyanकल्याण