शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:13 AM

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली : शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ते भरण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हतबल झालेल्या जुनी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी स्वत:हून पुढाकार घेत नुकतेच हे खड्डे भरले.जुनी डोंबिवली येथील स्टॅण्डवर जवळपास २०० रिक्षाचालक अनेक वर्षे व्यवसाय करतात. सध्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टॅण्डप्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अ‍ॅनेक्स फर्नांडिस, अरुण कोचरेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे असतातच. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात, हे माहीत नाही. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे रिक्षात प्रवासी म्हणून बसले की, पोटात गोळा येतो. खड्ड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे, असा मोठा पेच पडतो, असे कोचरेकर सांगतात.पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षाचालकांना अंग, कंबरदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. संपूर्ण शरीराची हेळसांड होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांतून रिक्षा गेल्याने गाडीचेही नुकसान होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. जोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील २० मोठे खड्डे गुरुवारपासून बुजवले. परंतु, जुनी डोंबिवली ते गिरिजामाता मंदिर परिसरात १० इंचांचे खड्डे पडले असून ते भरणे कठीण आहे. डेब्रिज टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. डेब्रिज टाकून समस्या सुटणार नाही, हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो, हे समजावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक शाखा, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्येकडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.महापालिका प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरून आम्हाला प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल तसेच आमचे आरोग्यही राखले जाईल, असेही रिक्षाचालक म्हणाले.कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणेही या पश्चिमेत राहत असून, त्यांचाही हा येण्याजाण्याचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे त्यांनी येथील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही रिक्षाचालकांनी केली.यासंदर्भात महापौर राणे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन तातडीने खड्डे भरण्याबाबत संबंधितांना आदेश दिले जातील, असे सांगितले. अतिपावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आधी जुनी डोंबिवली येथील रस्ते ठीक होते. आता पाऊस कमी झाला की, रस्त्यांची कामे करून घेऊ.- विश्वनाथ राणे, नगरसेवक वरहिवासी जुनी डोंबिवली

टॅग्स :dombivaliडोंबिवली