रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:20 AM2018-03-15T03:20:41+5:302018-03-15T03:20:41+5:30

अधिक भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी शहरात उघडकीस आली आहे. शिवाजी राठोड (रा. दुर्गाडी जुना पूल) यांनी मित्रासह दुर्गाडी चौक येथे जाण्यासाठी एक रिक्षा पकडली.

Rickshaw driver trawler | रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण

रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण

Next

कल्याण : अधिक भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी शहरात उघडकीस आली आहे.
शिवाजी राठोड (रा. दुर्गाडी जुना पूल) यांनी मित्रासह दुर्गाडी चौक येथे जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. परंतु, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षा पोहोचल्यानंतर राठोड यांनी रिक्षाचालकाला दुर्गाडी पुलाजवळ सोडण्यास सांगितले. त्यासाठी रिक्षाचालकाने अजून २० रुपयांची मागणी केली असता त्यास राठोड यांनी नकार दिला. त्या रागातून रिक्षाचालकाने राठोड यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी राठोड यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याआधारे रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आरपीएफ महिला कर्मचारी आणि एका प्रवाशाच्या घरावर दगडफेक करत त्याच्यासह कुटुंबीयांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्याच्या या दोन घटना नुकत्याच शहरात घडल्या होत्या.

Web Title: Rickshaw driver trawler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.