रिक्षा संघटनेला हवी किमान सात रुपये भाडेवाढ; २०१५ पासून भाडेवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:25 AM2020-02-05T01:25:55+5:302020-02-05T01:27:18+5:30

दोन वर्षांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही

Rickshaw Association needs to raise at least seven rupees; No rent increase since 2015 | रिक्षा संघटनेला हवी किमान सात रुपये भाडेवाढ; २०१५ पासून भाडेवाढ नाही

रिक्षा संघटनेला हवी किमान सात रुपये भाडेवाढ; २०१५ पासून भाडेवाढ नाही

Next

कल्याण : राज्य सरकारने २०१५ पासून रिक्षा प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. त्यामुळे थकीत असलेली भाडेवाढ देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केली आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी मीटरनुसार १८ रुपये आकारले जाते. त्यात सात रुपये भाडेवाढ करून २५ रुपये किमान भाडे निश्चित करावे, असा प्रस्ताव महासंघाने परिवहन प्रशासनाकडे मांडला आहे.

महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले की, ‘सरकारने कल्याणसह कोकण परिसरातील रिक्षा चालकांना २०१५ मध्ये भाडेवाढ दिली होती. त्यानुसार दर पत्रक परिवहन विभागाने जाहीर केले होते. त्यानंतर आजपर्यंत भाडेवाढ दिलेली नाही. कोकण विभागातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालत आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांचे प्रमाण कमी आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपये वाढ झालेली आहे. मात्र, रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही. २०१८ मध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे मांडला होता. मात्र, त्यावर अद्याप विचारविनिमय झालेला नाही. वाढती महागाई आणि इंधन दरवाढ होऊनही रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘१८ टक्के दरवाढ करण्यास राज्य परिवहन महामंडळाने परिवहन प्रशासनास मान्यता दिली आहे. तसेच हकीम समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी मे महिन्यात भाडेवाढीनुसार प्रवासी भाड्याचे दरपत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, ही शिफारस सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहे. विद्यमान सरकारने नियुक्त केल्या समितीने भाडेवाढीच्या बाजूने शिफारस केली आहे. रिक्षा देखभालीची खर्च धरून रिक्षा चालकंना कमी प्रवासी भाडे परवडत नसल्याचा मुद्दा महासंघाने उपस्थित केला आहे.’

‘रिक्षा स्टॅण्डच्या जागा अधिकृत आहेत. मात्र, तेथे अन्य वाहने बेकायदा उभी केली जातात. त्यामुळे तेथे रिक्षा स्टॅण्ड बनवून देण्यात यावेत, अशी मागणी परिवहन विभागाकडे केली होती. मात्र, एकही रिक्षा स्टॅण्ड प्रशासनाने अद्याप तयार करून दिलेला नाही. तसेच एमएमआरए क्षेत्रात शेअर-ए-रिक्षा स्टॅण्डला मंजुरी मिळाली होती. तेथे भाडे दरपत्रक न लावल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या शेअर-ए- रिक्षा स्टॅण्डच्या जागा बळकावल्या आहेत. तेथे रिक्षा चालकांकडून हप्ता वसुली केली जाते, या मुद्याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे,’ असे ते म्हणाले.

मनमानी भाडेआकारणी सुरूच

महासंघाने भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू नाहीत. मात्र, तरीही भाडे दरपत्रक हे मीटर रिक्षानुसार ठरविले जाते. कल्याणमध्ये ९५ टक्के रिक्षाचालक हे शेअर भाडे आकारून व्यवसाय करतात. मीटर रिक्षा व सीएनजी रिक्षा प्रवासी भाडे दर पत्रकाच्या एकूण ३३ टक्के प्रमाणात शेअर भाडे आकारले जाते. मात्र अनेक ठिकाणी रिक्षाचालक ३३ टक्केच्या रेशो ग्राह्य न धरता मनमानीपणे प्रवासी भाडे आकारता. काही वेळेस तर वाहतूककोंडीच्या नावाखाली आणखी तीन ते पाच रुपये जास्तीचे भाडे प्रवाशांकडून वसूल केले जाते.स्वयंघोषित शेअर रिक्षा भाडेवाढीच्या विरोधात आरटीओकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ही देखील वस्तूस्थिती आहे.

Web Title: Rickshaw Association needs to raise at least seven rupees; No rent increase since 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.