शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

निवृत्त नायब तहसीलदार ताब्यात? आणखी माेठे मासे अडकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:44 IST

कुशिवली धरण भूसंपादन माेबदला वाटप, आणखी एक गुन्हा

उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मयत मूळ वारसांच्या वारसांऐवजी अनाेळखी व्यक्तीने बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत तीन गुन्हे नाेंदवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. यात माेठे मासे अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगर प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका नायब तहसीलदाराला रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.ऑक्टोबर २०२१ मध्ये मृत मूळ मालकाच्या वारसांबाबत उल्हासनगरचे प्रांताधिकारी जयराज कारभारी यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रे सादर करून बनावट व्यक्ती भूसंपादनाचा मोबदला लाटत असल्याचे उघड झाले. कारभारी यांच्या आदेशाने अखेर ७ ऑक्टोबर २०२१  रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला.  तसेच ३० लाखांचे वाटप थांबविण्यात आले. कारभारी यांनी यापूर्वीच्या वाटपाची चौकशी केली असता, दोन प्रकार उघड झाले आहेत. त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात  ११ मे व २१ मे २०२२ रोजी गुन्हे दाखल झाले आहेत. 

या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला अटक होणे गरजेचे असल्याचे मत कारभारी यांनी व्यक्त केले. प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला पुन्हा कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले हाेते. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर ताे प्रकृती अस्वास्थ्याच्या नावाखाली गैरहजर राहिला हाेता. या प्रकाराने खळबळ उडाली असून यातून मोठे सत्य बाहेर पडण्याची शक्यता आहे.  

११ काेटींचे झाले वाटपउल्हासनगर प्रांत कार्यालयांतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणासाठी २०१९ पासून भूसंपादनाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी १५७ कोटी १६ लाखांची तरतूद केली आहे. आजपर्यंत भूसंपादन केलेल्या जमीन वाटपाची एकूण किंमत १८ कोटी ७८ लाखांपैकी ११ कोटी ५१ लाखांचे वाटप झाले, तर सात कोटी २० लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस