शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

इमारतीला तडा गेल्याने ११ परिवारांतील ५० जणांना शाळेत हलवले, ठाणे महापालिकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 04:24 IST

ठाणे शहरात गेल्या २४ तासांत ५६ मिमी पाऊस पडला. रात्रीच ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या धोकादायक इमारतीचा काही भाग शुक्रवारी पाडायला घेतला आहे.

ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असताना मध्यरात्री खोपट येथील गोकुळवाडीतील साई आनंद या चार मजली इमारतीला तडा गेल्यामुळे ती तत्काळ रिकामी करण्यात आली. ही इमारत केवळ २० वर्षांपूर्वी उभी केली होती. खबरदारीची उपाययोजना म्हणून या इमारतीतील आठ रूममधील रहिवासी, तर साळुंखे चाळीचे दोन आणि भोईर चाळीतील एक परिवार अशा ११ परिवारांतील तब्बल ५० जणांना जवळच्या महापालिकेच्या दोन शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच तळमजल्यावरील तीन दुकाने सील करण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.ठाणे शहरात गेल्या २४ तासांत ५६ मिमी पाऊस पडला. रात्रीच ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या धोकादायक इमारतीचा काही भाग शुक्रवारी पाडायला घेतला आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. या कालावधीत मुंब्रा कोळीवाडा येथील एक जुनी भिंत व घोडबंदर रोडवरील एक झाड धोकादायक स्थितीत आहे. साकेत रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ व कौसा येथील अशी दोन झाडे उन्मळून पडली. जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोडवर व वागळे इस्टेट येथील झाडाच्या फांद्या तुटल्या. मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आजही चुकला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातूनही पाऊस गायब झाला आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये १०४ मिमी म्हणजे सरासरी १४.८९ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात ५६ मिमी पाऊस झाला. या खालोखाल कल्याण १४ मिमी, अंबरनाथ ४ मिमी, उल्हासनगर ५ मिमी, भिवंडी १५ मिमी, शहापूर १० मिमी पाऊस पडला.ठाणे जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसीला आणि नगर परिषदांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात पाऊस पडला नाही. या धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :thaneठाणे