भाईंदर लोकल पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:27+5:302021-09-05T04:46:27+5:30

मीरारोड - भाईंदर स्थानकावरून सुटणारी पण सध्या बंद करण्यात आलेली सकाळी ११.५२ वाजताची भाईंदर लोकल तात्काळ सुरू करण्यात यावी, ...

Restart Bhainder Local | भाईंदर लोकल पुन्हा सुरू करा

भाईंदर लोकल पुन्हा सुरू करा

मीरारोड - भाईंदर स्थानकावरून सुटणारी पण सध्या बंद करण्यात आलेली सकाळी ११.५२ वाजताची भाईंदर लोकल तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी केली आहे.

११.५२ ची भाईंदर लोकल मीरा-भाईंदरच्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी होती. परंतु रेल्वे प्रशासनाने ती लोकल बंद केल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच भाईंदर व मीरारोड रेल्वेस्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करणे, सोयीसुविधा मिळणे त्यासाठी आमदार जैन यांनी पश्चिम रेल्वे महाप्रबंधक आलोक कन्सल यांची चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचे मुख्य कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी महाप्रबंधक यांनी ११.५२ ची भाईंदर लोकल पुन्हा चालू करण्यासह प्रवाशांच्या समस्या सोडविणे, सोयीसुविधा देणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती आ. जैन यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी पश्चिम रेल्वे सल्लागार समिती शैलेश गोयल उपस्थित होते.

Web Title: Restart Bhainder Local