शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मिसिंग लिंकचे काम आवश्यक, ठाणे महापालिकेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 02:24 IST

घोडबंदर भागात आता मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु हे काम करताना येथील वाहतूककोंडीवर मात करण्याचे मुख्य आव्हान पालिकेसह इतर सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकणार आहे.

- अजित मांडके ठाणे : घोडबंदर भागात आता मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु हे काम करताना येथील वाहतूककोंडीवर मात करण्याचे मुख्य आव्हान पालिकेसह इतर सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकणार आहे. यावर उपाय म्हणून या भागातील मिसिंग लिंक विकसित केल्यास वाहतूक कोंडी सोडवण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय कोस्टल रोड आणि फूट हिल रोडसुद्धा विकसित केल्यास भविष्यात घोडबंदरकरांना वाहतूककोंडीचा सामना कमी प्रमाणात करावा लागेल. मेट्रोच्या कामाचा विचार करता, त्यावर आताच उपाययोजना होणे अपेक्षित आहे.शहराचा विकास झपाट्याने होत आहे. विकासकामांनाही आता सुरुवात झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या कासारवडवली ते वडाळा मेट्रोची प्रतीक्षा ठाणेकर करत होते, त्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाळा आणि रस्त्यावर सुरू झालेले काम पाहता नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वाहतूक नियंत्रण कक्षाने रिलायन्स एजन्सीला मातीपरीक्षणासाठी रस्त्यामध्ये बॅरिकेड्स बांधण्याची परवानगी १ आॅक्टोबरपर्यंत दिली आहे. १ आॅक्टोबरनंतर एमएमआरडीएच्या विनंतीवरून पुढील किमान तीन वर्षे मेट्रोच्या कामासाठी परवानगी देण्यात येणार आहे. ठाणेकरांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी त्यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आजही घोडबंदरवर एक वाहन नादुरूस्त पडले, तरी मोठी कोंडी होते. त्यामुळे कासारवडवली ते वडाळा या मेट्रोमार्गाचे काम सुरू झाल्यास होणाऱ्या वाहतूककोंडीवर आताच उपाययोजना होणे गरजेचे आहे. येथील रस्ता चारपदरी असला तरी मेट्रोच्या कामामुळे ही कोंडी वाढणार आहे. त्यामुळे आता येथील मिसिंग लिंक विकसित करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे.>अवजड वाहने परस्पर शहराबाहेर काढणे शक्यवाघबीळ-वसंतलीला ते हिरानंदानी मिसिंग लिंक रस्त्याची लांबी २५०, रुंदी ४० मी., हिरानंदानी ते तुर्पेपाडा तलाव मिसिंग लिंक रस्ता - २०० मी लांबी, २० मी. रुंदी, गुडलॅस नेरोलॅक पेंट कंपनीसमोरून कावेसर तलाव - ९०० मी. लांबी, २० मी. रुंदी, सरस्वती शाळा ते वाघबीळ यामधील मिसिंग लिंक रस्त्यातील प्राथमिक शाळा ते गुडलॅस नेरोलॅक पेंट - ४०० मी. लांबी, रुंदी ३० मी., आनंदनगर ते वाघबीळ येथून येणारे रस्ते - १३०० मी. लांबी, ३० मी. रुंदी, घोडबंदर रोड ते वाघबीळपर्यंतचा रस्ता - २१०० मी. लांबी, ४० मी. रुंदी, कोलशेत रस्त्याचे ढोकाळीनाका ते क्लिरियंट कं. जंक्शनपर्यंत बांधकाम - ३००० मी. लांबी, ४० मी. रुंदी, राममारुतीनगर रस्त्याचे रुंदीकरण - ११५० मी. लांबी, ३० मी. रुंदी, तरीचापाडा डी.पी. रस्ता विकसित करणे - ७५० मी. लांबी, २० मी. रुंदी, तलाव पार्क आरक्षण डी.पी. रस्ता - ७५० मी. लांबी, ४० मी. रुंदी अशा प्रकारे रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.ब्रह्मांड मिसिंग लिंकचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होणार आहे. हा रस्ता कोलशेतपर्यंत जातो. त्यामुळे घोडबंदरकडील वाहतूक थेट यामार्गे जेएनपीटी, विटावा, कळवा येथेही जाऊ शकणार आहे. हाइड पार्क, तुळशीधाम, काशिनाथ घाणेकर येथील रस्त्यांसह कासारवडली, वेदान्त हॉस्पिटल येथील रस्त्याचे कामही सुरू होणार आहे. सरस्वती ज्युनिअर कॉलेज ते कासारवडवली रस्त्याची वर्कआॅर्डर दिली आहे. हे संपूर्ण मिसिंग लिंक ५ ते १० किमीचे असणार असून या लिंकमुळे मुख्य रस्ते अनेक ठिकाणी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या मिसिंग लिंकचा फायदा अवजड वाहने परस्पर बाहेर काढण्यासाठी होणार आहे.>खारीगाव ते गायमुख कोस्टल रोडला चालना देणे गरजेचेइतर ठिकाणांहून ठाण्यात प्रवेश करताना तसेच मुंबईहून ठाण्याच्या बाहेर जाताना घोडबंदर रोडवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित खारीगाव-गायमुख कोस्टल रोडच्या मार्गाला पर्यावरण विभाग आणि संरक्षण खात्याने मंजुरी दिली आहे. मात्र, १२ किमी लांबीचा खाडीपूल आणि ५०० मीटरचा बोगदा अशा पद्धतीने या रस्त्याची उभारणी करण्याची सक्ती असल्याने या मार्गाचा खर्च ३०० कोटींवरून एक हजार कोटींवर गेला आहे. आयुक्तांनी लक्ष घातले, तर हा मार्ग सुकर होईल.>श्रीनगर ते गायमुख फूट हिल रस्ता काळाची गरजईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि घोडबंदरवरील वाहतूककोडींला पर्याय मिळावा, म्हणून घोडबंदर रोडला समांतर रस्ता तयार करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार, श्रीनगर ते गायमुख या डीपी रोडचा पर्याय पुढे आला. परंतु, यामध्ये असलेली बांधकामे आणि वनविभागाची जागा यामुळे हा रस्ता पालिकेच्या दप्तरी जमा झाला होता.आठ वर्षांनंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्याच्या कामासाठी नव्याने हालचाली सुरू केल्या असून लवकरच त्याच्या सर्व्हेलाही सुरुवात केली जाणार आहे. या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.हा रस्ता फूट हिल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. तो ४० मीटर रु ंद आणि ६ किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याने घोडबंदर रोडवरील कासारवडवली किंवा गायमुख बायपासपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे केवळ घोडबंदरच नव्हे तर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका