शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कळवा रु ग्णालयाला हवीय सुरक्षा, रु ग्णालय प्रशासनाने केली पालिका आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:59 IST

एकीकडे कळवा रुग्णालयात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, तर दुसरीकडे या रुग्णालयाची सुरक्षा देखील आता चिंतेचा विषय झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने येथे ८१ पैकी केवळ १५ सुरक्षा रक्षकच सध्या येथे कार्यरत आहेत.

ठाणे : कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयावर रु ग्णांचा मोठा भार आहे. त्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ८१ जवान रु ग्णालयाची सुरक्षा करत आहेत. परंतु कोरोनामुळे सध्या रु ग्णालयात फक्त १५ सुरक्षा रक्षकच उपलब्ध राहत असल्याने या रु ग्णलयात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.               ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षेसाठी ठाणे महानगरपालिकेची स्वत:ची सुरक्षा रक्षक यंत्रणा आहे. मात्र ही संख्या कमी असल्याने ठाणे महानगरपालिकेने ठेकेदारी पद्धतीवर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे ६७४ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५५ सुरक्षा रक्षक नेमले आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेची आणि सुविधा विभागांची सुरक्षा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग ठाण्यात वेगाने पसरत असल्याने पालिकेने तयार केलेल्या भार्इंदर पाडा, कासारवडवली या ठिकाणच्या क्वारोन्टाइन विभागाची सुरक्षा करत आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णलयात ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील रु ग्ण हलविण्यात आले असल्याने पालिकेच्या या रु ग्णालयावर मोठा ताण वाढला आहे. या रु ग्णालयाची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलावर सोपविण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे रोज सुमारे निम्म्याहून जास्त रु ग्ण गैरहजर रहात असल्याचे दिसते आहे. १ जानेवारीपासून या रु ग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ८१ जवानांवर सोपविण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत येथे फक्त १५ ते १६ सुरक्षा रक्षक उपास्थित आहेत. रु ग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांनी याबाबत पालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून १६ मे रोजी रु ग्णालयात पिहल्या सत्रात केवळ १५ सुरक्षा रक्षक हजर असून त्यातील ३ सुरक्षा रक्षकांना अतिरिक्त कर्तव्यासाठी थांबविण्यात येत असून ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षा अभावी या रु ग्णालयाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना वाटते आहे. त्यामुळे पालिकेने येथील सुरक्षा त्वरीत वाढवावी अशी विनंती डॉ. प्रतिभा सावंत यांनी पालिका आयुक्त सिंघल यांचेकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल