शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

शिरगावच्या डोंगराला पुन्हा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:37 AM

बदलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत वणवा पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत

बदलापूर : बदलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत वणवा पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वनसंपदा या वणव्याच्या विळख्यात सापडली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कात्रप परिसरात लागलेल्या वणव्याने शेकडो एकर जंगल जळून खाक झाले. तर, आता शिरगावमागील परिसरात असलेल्या डोंगराचा मोठा भाग वणव्यात जळून खाक झाला आहे. वणवे सातत्याने लागत असताना वनविभाग मात्र या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कासगाव येथील डोंगरालाही बुधवारी रात्री वणवा लागला होता.बदलापूर आणि परिसराला मोठी वनसंपदा लाभली आहे. त्यामुळे येथे वनक्षेत्रपाल कार्यालयही आहे. या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतात. वनविभागाच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या डोंगरवणव्याने जळून खाक होत असताना वनविभाग मात्र ढिम्म बसून आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर, वनअधिकारी आता माहिती मिळाली आहे, कर्मचारी पाठवतो, बघतो, असे उत्तर देत आपली अकार्यक्षमता दाखवली आहे.वणवा पेटत असताना संपूर्ण शहरात तो दिसतो, त्यावेळेस वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न बदलापूरकरांना पडला आहे. वणवे पेटण्याच्या प्रकारात बेजबाबदार आणि दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, अंबरनाथमध्येही अशाचप्रकारे वनसंपदा नष्ट झाली होती.