शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

खर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था; २० वर्षांपासून ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:54 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खर्डी : मागील २० वर्षांपासून खर्डी रेल्वेस्थानक आणि महामार्गाला जोडणाऱ्या गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अगदी चालतानाही अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मुख्य गावाला जोडणारे रस्ते डांबरी होते, यावर विश्वासच बसत नाही, अशी आजची परिस्थिती आहे.

काष्टी ते दळखण, चांदे ते खर्डी, तळेखण-धामणी ते खर्डी, कुंभईपाडा-सुगाव ते खर्डी, वंगणपाडा ते खर्डीगाव, घाणेपाडा-बागेचापाडा ते खर्डी या विभागातील गावांना जोडणारे मुख्य रस्ते असून त्यांची दुरवस्था झाली आहे. रात्रीअपरात्री या रस्त्यांवरून ग्रामस्थांना रोजच जीवघेणा प्रवास करावा लागतो. रुग्ण, गर्भवतींना येथून येजा करताना त्रास होतो. हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेंतर्गत येत असल्याने या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाने करायची आहे.

येथील ग्रामपंचायती छोट्या आणि अदिवासीबहुल असल्याने रस्त्यांसाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेकडून किंवा आमदार, खासदार निधीतून या रस्त्यांची दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरु स्तीबाबत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अधिकाऱ्यांशी चर्चा करणार

लवकरच या रस्त्यांच्या दुरु स्तीबाबत संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी दिले.

दोन रस्त्यांच्या कामाला सुरुवात

समृद्धी महामार्गाजवळील दळखण, काष्टी, धामणी तळेखण, खर्डी चांदा, पेठ्यापाडा, वाशाळा येथील जिल्हा परिषदेंतर्गत रस्ते समृद्धी महामार्ग बनविणारी कंपनी रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. तसेच घाणेपाडा, बागेचापाडा या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचीमाहिती जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत यांनी दिली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र